Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई, 15 दिवसात 211 आरोपींना अटक करत 253 शस्त्रे जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 19 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या 15 दिवसांच्या (Pimpri Chinchwad) कालावधीत 211 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 253 घातक शस्त्रे जप्त केली आहेत. पोलिसांनी राबवलेल्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

या मोहितेम पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेले सर्व पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी 36 गुन्हे हे केवळ बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या विरोधात दाखल केले असून इतर घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी 150 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेत पोलिसांनी 211 आरोपींना अटक केले आहे. त्यांच्याकडून 48 पिस्टल, 205 घात शस्त्रे असे एकूण 253 शस्त्रे जप्त केली आहेत.

Chinchwad Bye-Election : उमेदवारी जाहीर झाल्यावर अश्विनी जगताप म्हणाल्या…

हि कारवाई करत असताना तपासी पथकांनाही प्रोत्साहन मिळावे म्हणून कामगिरीनुसार त्यांना क्रमांक देण्यात आले आहेत. यात प्रथम क्रमांक दरोडा विरोधी पथक, द्वितीय क्रमांक गुंडा विरोधी पथक, तृतीय क्रमांक युनीट-4 यांनी मिळवला आहे. तसेच, पोलीस ठाणे स्तरावर महाळुंगे, शिरगाव, पिंपरी या पोलीस ठाणे यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या (Pimpri Chinchwad) मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या घटक प्रमुखांना व अंमलदारांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करणार आहेत. तसेच यापुढेही ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे, असेही पोलीस आयुक्त चौबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.