Pimpri Chinchwad Police : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या एकूण 136 पोलीस अंमलदारांची पदोन्नती झाल्याने सत्कार

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील नेमणुकीस असलेल्या एकूण 136 पोलीस अंमलदाराची पदोन्नती झाल्याने तसेच पाच अधिकारी/ अंमलदार हे पोलीस दलातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ पोलीस मुख्यालय निगडी येथे आयोजित करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ज्या पोलीस अंमलदाराची सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठीसाठी पात्र आहेत, अशा सर्व पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्याबाबत प्रशासकीय अधिकारी, पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील नेमणुकीस असलेले एकूण 136 पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामध्ये पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांपैकी 45 पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती (Pimpri Chinchwad Police) देण्यात आली आहे. तसेच, 95 पोलीस अंमलदार यांची पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आलेली आहे. असे एकूण 136 पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. पदोन्नती झालेल्या अंमलदारांना सपत्नीक बोलावून पोलीस आयुक्त शिंदे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

तसेच अनिल दबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा, नंदू खुळपे, प्रशासकीय अधिकारी, आस्थापना शाखा, संजय काळे, पोलीस उपनिरीक्षक, विनायक वर्पे पोलीस हवालदार, संजय भागवत, पोलीस नाईक हे नियत वयोमानानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचाही पोलीस आयुक्त शिंदे यांच्या हस्ते सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमात बोलताना पोलीस आयुक्त शिंदे म्हणाले, की पोलीस अंमलदार हे पोलीस दलाचा पाया असून दिवस रात्र रस्त्यांवर उभे राहून जनतेच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. अशावेळी त्यांच्या कामाचे कौतुक करून मनोबल वाढवल्यास त्यांना अधिकाधिक उत्कृष्ट कर्तव्य (Pimpri Chinchwad Police) बजावता येईल. या दृष्टिकोनातून सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र आहेत, अशा सर्व पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

Loan App Scam : देशातील सर्वात मोठा लोन अॅप घोटाळ्याचा पर्दाफाश, 18 अटकेत, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

सर्व पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदार यांना समाजासाठी उत्कृष्ट काम करून जागतिक स्तरावर लौकिक मिळविणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाची शौर्याची व त्यागाची परंपरा जोपासून पोलीस दलाचे नाव उंच व्हावे, असे गौरवोद्गार करत मार्गदर्शन करून पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलात येऊन समाजासाठी आपण दिलेले योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे. सेवानिवृत्तीनंतरही आपले हातून अशीच जनसेवा घडावी असे बोलून सत्कारमूर्ती पोलीस अधिकारी अंमलदार यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीस व भावी आयुष्यात शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, मंचक इप्पर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, यांच्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी सर्व सत्कारमूर्ती यांना पुढील आयुष्यासाठी व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.