Pimpri : पोलीस आयुक्तालयाचे कामकाज 15 ऑगस्टपूर्वी सुरू होणार – गिरीश बापट 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी होणा-या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे कामकाज 15 ऑगस्टपूर्वी चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथून सुरू केले जाणार आहे. पोलीस आयुक्तालयाची चिंचवड प्रेमलोक पार्कच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) पीएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभम, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

या बैठकीतील माहिती देताना एकनाथ पवार म्हणाले, पोलीस आयुक्तालयाचे कामकाज 15 ऑगस्टपूर्वी सुरू केले जाणार आहे. त्यासाठी चिंचवडच्या ऑटो क्‍लस्टर येथे पोलीस आयुक्त व अतिरिक्त पोलीस आयुक्ताचे तात्पुरते कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेथून कामकाज सुरू करणार आहेत. एकूण 15 पोलीस ठाण्याअंतर्गत 2 हजार 200 पोलीस कर्मचार्‍यांचा ताबा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, 3 टप्प्यात 2 हजार 700 पोलीस कर्मचारी मिळणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.