BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तिघांना राष्ट्रपती पोलीस पदक

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शौर्य पदक, पोलीस शौर्य पदक, उत्कृष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) आणि एक पोलीस निरीक्षक यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले.

सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना उत्कृष्ठ सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

देशभरातील तीन जणांना राष्ट्रपती शौर्य पदक, 177 जणांना पोलीस शौर्य पदक, 89 जणांना उत्कृष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर 677 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे. त्यातील दोघेजण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील 41 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ठ सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3