Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले आहे. आयुक्तालय 15 ऑगस्ट पासून कार्यान्वित झाले असून आयुक्तालयाचे औपचारिक उदघाटन बुधवारी (दि. 9) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा उदघाटनाचा कार्यक्रम दुपारी साडेचार वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

उदघाटन समारंभासाठी पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, शिवाजीराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चौबुकस्वार, महेश लांडगे, सुरेश गोरे, मेधा कुलकर्णी, संजय भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाहुण्यांचे साडेचार वाजता पोलीस आयुक्तालयात आगमन होईल. त्यानंतर पोलिसांकडून मानवंदना, प्रवेशद्वारावर फीत कापून कोनशिलेचे अनावरण होणार आहे. त्यानंतर प्रमुख पाहुणे आयुक्तालयाची पाहणी करणार आहेत. पाहणी केल्यानंतर आयुक्त दालनात जाऊन प्रत्यक्ष पाहणीचा शेरा देतील. आयुक्तालयाच्या सध्या असलेल्या अडचणी मुख्यमंत्र्यांपुढे यावेळी मांडण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.