Chinchwad : कोरोना काळात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 15 हजार जणांवर विनामास्कची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 19 मार्च ते 24 नोव्हेंबर या कोरोनाच्या काळात 15 हजार 649 जणांवर विनामास्कची कारवाई केली. तर 893 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. 60 हजार 994 जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. नियमभंग करणा-यांकडून 87 लाख 84 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या. त्याचबरोबर अनेक नियमही बनवले. त्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, न थुंकणे असे नियम आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 पोलीस स्टेशन, तीन पोलीस चौकी आणि 10 वाहतूक विभाग यांनी ही कारवाई केली आहे. भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे पिंपरी, निगडी, आळंदी, चाकण, सांगवी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात 893 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारतीय दंड विधान कलम 188 नुसार पोलिसांनी 35 हजार 973 जणांवर तर वाहतूक पोलिसांनी 25 हजार 21 जणांवर असे एकूण 60 हजार 994 जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

कोरोना काळात विनामास्क फिरणा-या 6 हजार 473 जणांवर पोलीस ठाण्यात तर 9 हजार 176 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. एकूण 15 हजार 649 जणांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना काळात नियमभंग करणा-यांवर 87 लाख 84 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामध्ये 41 लाख 95 हजार 500 रुपये पोलिसांनी तर 45 लाख 89 हजार रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी आकारला आहे.

कोरोना काळातील विनामास्कची कारवाई –

भोसरी एमआयडीसी – 684
भोसरी – 956
पिंपरी – 241
चिंचवड – 221
निगडी – 179
आळंदी – 880
चाकण – 43
दिघी – 55
सांगवी – 431
वाकड – 526
हिंजवडी – 1
देहूरोड – 112
तळेगाव दाभाडे – 673
तळेगाव एमआयडीसी – 200
चिखली – 455
रावेत चौकी – 266
शिरगाव चौकी – 314
म्हाळुंगे चौकी – 236
वाहतूक विभाग – 9 हजार 176
एकूण – 15 हजार 649

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.