Chichwad : कोरोना व्हायरसचा नकाशा उघडू नका, डाऊनलोडही करू नका!

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसचा प्रसार कोणकोणत्या देशात झाला आहे, हे पाहण्यासाठी इंटरनेटवर कोरोना व्हायरसचा नकाशा ओपन अथवा डाऊनलोड करू नका, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले आहे. 

 

जगात कोठे कोठे कोरोना व्हायरसचे रुग्ण अधिक आहेत, याची माहिती अनेकजण संगणकावरून घेत असल्याचे दिसून आले आहे. याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेतला आहे. त्यांनी करोना व्हायरसचा नकाशा ऑनलाइन टाकला आहे. हा नकाशा उघडताच संगणकातील माहिती सायबर चोरटे घेतात. त्यात आपला पासवर्डही चोरला जातो. यामुळे हा नकाशा कोणीही उघडू नका किंवा डाऊनलोडही करू नका, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेने केले आहे.

 

संबंधित बातम्या वाचा 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.