Chinchwad : अत्यावश्यक कारणांसाठी आंतरजिल्हा  प्रवासासाठी राज्य पोलिसांकडून ई-पासची सुविधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या हद्दीत जाण्यासाठी पोलिसांकडून ई-पासची सोय करण्यात आली आहे. मृत्यू, वैद्यकीय आणि इतर महत्वाच्या कारणांसाठी हे पास दिले जातील. त्यासाठी नागरिकांनी पोलिसांकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

आंतरजिल्हा प्रवासासाठी –

# आंतरजिल्हा प्रवासासाठी https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन पिंपरी चिंचवड पोलीस येथे स्वतः रजिस्टर होऊन आवश्यक ते कागदपत्र व फोटो अपलोड करून अर्ज करावा
# अर्ज भरताना आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक सेवा, कारण, उद्देश स्पष्ट लिहावा
# आंतरजिल्हा प्रवास प्रारंभ ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण स्पष्ट लिहावे
# योग्य कागदपत्रे जोडावीत
# ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधितांना टोकन दिले जाईल. टोकन क्रमांक जपून ठेवावा. त्याद्वारे अर्जाची स्थिती जाणून घेण्यास मदत होईल.
# पोलिसांकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच ई-पास दिला अथवा नाकारला जाईल.
# अर्जाची सद्यस्थिती जाणून घेताना अर्ज मंजूर झाला असल्यास वेबसाईटवरूनच आपला ई-पास डाउनलोड करावा.
# ई-पास मिळाल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी संबंधितांनी जवळ ठेवावी. पोलिसांनी नाकाबंदीच्या ठिकाणी मागितल्यास पोलिसांना ती दाखवावी.
# ई-पास केवळ आंतरजिल्हा प्रवासासाठीच दिले जातील.

आंतरराज्य प्रवासासाठी –

आंतरराज्यीय प्रवासासाठीचे पास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दिली जात नाहीत. हे पास पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथून दिले जातात. त्यासाठी नागरिकांनी [email protected] या मेल आयडीवर अर्ज करावा. त्यात प्रवासाचे योग्य कारण द्यावे लागणार आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फिरण्यासाठी –

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराच्या परिसरात जाण्यासाठी ऑनलाइन ई-पास दिले जाणार नाहीत. लॉकडाऊनच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ (आयुक्तालयाकरिता), पोलीस उपायुक्त स्मिता पाटील (परिमंडळ एक), पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे (परिमंडळ दोन) यांची इन्सीडन्ट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लॉकडाऊन असलेल्या कालावधीत अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरू राहणार असल्याने ज्यांना पास हवे आहेत, त्यांनी आपल्या आस्थापना ज्या हद्दीत आहेत, त्या पोलीस ठाण्यांच्या पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयातून आवश्यक कागदपत्रे जमा करून पास घ्यावेत, असे सांगण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात अत्यावश्यक कारणासाठी पास मिळण्याची ठिकाणे –

परिमंडळ एक – पोलीस उपायुक्त स्मिता पाटील
कार्यालय पत्ता – दुसरा मजला, प्रीमियर कंपनी शेजारी, जुना पुणे-मुंबई रस्ता, चिंचवड
संपर्क क्रमांक – 9834957526
ई-मेल – [email protected]
परिमंडळ हद्दीत येणारे पोलीस स्टेशन – पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी भोसरी, निगडी, दिघी, चाकण, आळंदी पोलीस स्टेशन, म्हाळुंगे पोलीस चौकी

परिमंडळ दोन – पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे
कार्यालय पत्ता – पहिला मजला, प्रीमियर कंपनी शेजारी, जुना पुणे-मुंबई रस्ता, चिंचवड
संपर्क क्रमांक – 9529861471
ई-मेल – [email protected]
परिमंडळ हद्दीत येणारे पोलीस स्टेशन – हिंजवडी, वाकड, सांगवी, देहूरोड, चिखली, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, रावेत, शिरगाव पोलीस चौकी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.