Chinchwad : सोमवारी 89 जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – संचारबंदीतही रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या 89 जणांवर सोमवारी (दि. 6) पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आत्तापर्यंत सुमारे दीड हजार जणांवर कारवाई केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात संचारबंदीचेही आदेश पोलिसांनी लागू केले आहेत. खासगी वाहनांना रस्त्यावर आणण्यास मनाई केली आहे. सोमवारी शहरातील पोलिसांनी तब्बल 89 जणांवर कारवाई केली आहे. तरी देखील रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्याच्या संख्येत घट होताना दिसत नाही.

नागरिकांनी घरात बसून शासनाच्या सूचनांचे पालन करवून सहकार्य करावे. सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे.

सोमवारी केलेली कारवाई –

आळंदी 04
तळेगाव एमआयडीसी 01
हिंजवडी 17
देहूरोड 08

सांगवी 08
पिंपरी 06
भोसरी 06
चाकण 15
चिंचवड 06
दिघी 14
तळेगाव दाभाडे 04
एकूण 89

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.