Pimpri Chinchwad Police Recruitment : उद्या होणार पिंपरी चिंचवड पोलीस भरतीची लेखी परीक्षा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस (Pimpri Chinchwad Police Recruitment) दलातील पोलीस शिपाई (police constable) पदाच्या रिक्त 216 जागांसाठी भरती केली जात आहे. या पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार पडली असून आता लेखी परीक्षेची तारीख (police recruitment written test date) जाहीर करण्यात आली आहे. उद्या  रविवारी (दि. 2 एप्रिल) सकाळी साडेआठ वाजता लेखी परीक्षा होणार आहे. उमेदवारांना policerecruitment2022. mahait.org  या संकेतस्थळावरून लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे.
पोलीस शिपाई पदासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची भरती सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात 216 पोलीस शिपाई पदांसाठी 15 हजार 147 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील 11 हजार 825 पुरुष तर 2 हजार 91 महिला उमेदवारांसह 13 हजार 916 उमेदवारांनी शुल्क भरले.
शुल्क भरलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी नेमलेली त्रयस्थ संस्था महा-आयटी (mahait) यांच्याकडून ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात आले. त्यातील 9 हजार 772 उमेदवारांनी 30 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल (srpf) गट क्रमांक 02, वानवडी, हडपसर, पुणे येथे मैदानी चाचणी दिली.

 

 

Today’s Horoscope 01 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांसाठी पोलिसांकडून पुढील सूचना देण्यात आल्या आहेत –
1. मैदानी चाचणीच्यावेळी देण्यात आलेले प्रवेशपत्र व लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र असे दोन्ही प्रवेशपत्र उमेदवाराकडे असतील तरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. अन्यथा लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. तसेच स्वतःचे पासपोर्ट साईज आकाराचे प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या फोटोची एक प्रत सोबत आणावी.
2.  लेखी परीक्षा 90 मिनिटांची व 100 गुणांसाठी आहे.
3. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल.
4.  उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी दोन तास अगोदर सकाळी सहा वाजता पोहोचणे अपेक्षित आहे. परिक्षेस येण्यास विलंब झाल्यास कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही. अशा उमेदवारांना परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच त्यांना लेखी परिक्षेकरिता पुन्हा संधी दिली जाणार नाही.

5. उत्तरपत्रिका कार्बनलेस ओ.एम.आर. (OMR Sheet) प्रकारची दोन प्रतीत असेल व दुय्यम प्रत उमेदवारास त्याच्या सोबत घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
6.  ओएमआर शीट वरील सूचनांचे काटकोरपणे पालन करावे. तसेच फक्त काळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन सोबत आणावे.
7. ओएमआर शीटवर स्वतःची ओळख उघड होईल असे कोणतेही चिन्ह (Pimpri Chinchwad Police Recruitment)नमूद करु नये. नाव लिहू नये. खाडाखोड अथवा पुनर्लेखन करु नये. असे आढळून आल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल.
8.उमेदवार कॉपी करताना आढळून आल्यास त्याच्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
9.कोणीही उमेदवारांनी सॅक / बॅग अथवा किंमती वस्तू सोबत आणून नयेत त्या गहाळ झाल्यास जबाबदारी या कार्यालयाची नाही.
10. परीक्षा केंद्रात एकदा प्रवेश केल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत बाहेर जाण्यास सक्त मनाई राहील.
11. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन / डिजीटल वॉच / डिजीटल डायरी / मायक्रोफोन / कॅलक्युलेटर / नोटपॅड / नोटस् पुस्तके / ईअरफोन / hearing aide device इत्यादी तसेच इतर कुठलेही असे साहित्य, ज्याचा कॉपी करण्यासाठी उपयोग होईल अथवा उपयोग होऊ शकतो असे साहित्य आण्ण्यास सक्त मनाई आहे. असे करणारा उमेदवार आढळून आल्यास त्यास त्याच क्षणी बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. तसेच कसुरदाराविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
12.  अंतिम निकाल लागल्यानंतर उमेदवारांना लेखी परिक्षेस प्राप्त गुणांसंदर्भात काही शंका / तक्रार असल्यास त्या संदर्भात निकालानंतर 24 तासाच्या आत उमेदवारांनी अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड (भरती अध्यक्ष) यांच्या नांवाने 200 रुपये शुल्कासह हजर राहून लेखी निवेदन सादर करावे. 24 तासानंतर येणा-या उमेदवारांच्या निवेदनाचा विचार करण्यात येणार नाही.
13. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना व आमिषाला बळी पडू नये. गैरप्रकार करताना कोणी आढळून आल्यास नियंत्रण कक्ष पिंपरी चिंचवड 020-27352500/020-27352600 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.