Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आणखी 94 जणांवर कारवाई

Pimpri Chinchwad police take action against 94 others for violating lockdown rules.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि.18) 94 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.

सोमवार (दि. 18) पासून देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. प्रत्येक राज्यातील स्थिती पाहून काही गोष्टी सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत. तर काही गोष्टी पुढील काळातही बंदच राहणार आहेत.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे पर्यंत असणार आहे. दरम्यान, प्रशासनाने काही बाबतीत नागरिकांना मुभा दिली आहे. काही खासगी दुकाने, अस्थापना सुरु करण्याबाबत नियमावली देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात उपचार घेऊन इंदिरानगर, चिंचवड, मोशी, संभाजीनगर, गणेशनगर, तळवडे आणि सांगवीतील सहा जण सोमवारी कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

तर, सोमवारी एकाच दिवशी शहरातील 11 पुरुष आणि 11 महिला अशा 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे दिघी, आनंदनगर, भाटनगरमधील काही परिसर सील करण्यात आला आहे.

सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (5), भोसरी (6), पिंपरी (4), चिंचवड (17), निगडी (8), आळंदी (0), चाकण (3), दिघी (19), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (13), वाकड (2), हिंजवडी (0), देहूरोड (1), तळेगाव दाभाडे (3), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (11), रावेत चौकी (1), शिरगाव चौकी (1) एकूण 94 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.