Pimpri Chinchwad Police : शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील  (Pimpri Chinchwad Police) सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिले आहेत.

शहर पोलीस दलात नव्याने बदलीवर चार सहाय्यक पोलीस आयुक्त हजर झाले आहेत. तसेच हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. या पाच सहाय्यक पोलीस आयुक्तांची प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तालयातील अन्य तीन सहाय्यक आयुक्तांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

Alandi : आषाढी वारी पार्श्वभूमीवर जलपर्णी काढणी कामास सुरवात

सहायक पोलीस आयुक्त (पदस्थापनेचे ठिकाण) – Pimpri Chinchwad Police

विशाल शामराव हिरे (पिंपरी विभाग)
राजेंद्रसिंह प्रभूसिंह गौर (चाकण विभाग)
बाळासाहेब दिनकर कोपनर (विशेष शाखा)
भास्कर प्रभाकर डेरे (प्रशासन)
विठ्ठल खंडूजी कुबडे (वाहतूक)
प्रेरणा जीवन कट्टे (गुन्हे एक)
सतीश दत्तात्रय माने (गुन्हे दोन)
पद्माकर भास्करराव घनवट (देहूरोड विभाग)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.