एमपीसी न्यूज : पोलिसांसमोर बालगुन्हेगारी आणि दहशत निर्माण (Pimpri Chinchwad Police) करणाऱ्या टोळींवर नियंत्रण आणणे असे दोन आव्हाने आहेत. ही माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “बालगुन्हेगारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालाय हद्दीत वाढत आहे. जी एक चिंतेची बाब आहे. बालक गुन्हेगारीत शामिल होऊ नयेत अशी माझी भावना आहे. आम्ही सर्व विधिसंघर्षित बाळाकांची माहिती काढतोय. आम्ही त्यांच्या पालकांना भेटून त्यांचे प्रबोधन करणार. तसेच, त्या परिसरातील इतर पालकांना त्यांच्या मुलामुलींवर लक्ष ठेवायला सांगणार.”
शिंदे म्हणाले, की शहरात (Pimpri Chinchwad Police) बऱ्याच ठिकाणी काही टोळ्या वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करतात. त्यांना नियंत्रणात आणणे हे दुसरे आव्हान आहे.