PCMC News : खड्डे बुजविण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन; आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे आहेत. खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 2022 ची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे.(PCMC News) 31 डिसेंबरपर्यंत सर्व खड्डे बुजविले जातील असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. तसेच पवना बंदिस्त जलवाहिनीचा रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरु आहेत. याबाबत राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही कामासाठी रस्ता खोदल्यास काम झाल्यानंतर ते तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. दिशादर्शक, सूचना बोर्ड लावले पाहिजेत. त्यासाठीच्या सूचना दिल्या असल्याचे सांगत आयुक्त सिंह म्हणाले,  आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून उचलण्यात येणा-या 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे.

Pimpri News : गोवरचा उद्रेक नाही, चिंतेचेही कारण नाही; पण, खबरदारी घ्यावी – आयुक्त शेखर सिंह

पहिल्या टप्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठीचे निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचेही (जॅकेवल) काम पूर्ण झाले आहे.(PCMC News)  लवकरच त्याचे उद्घाटन केले जाईल. त्यामुळे 100 एमएलडी वाढीव पाणी मिळेल. त्यानंतर पाण्याच्या तक्रारी कमी होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.