PCMC News : शहरातील 96 टक्के खड्डे बुजविले, आता केवळ 269 खड्डे; प्रशासनाचा दावा

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील रस्त्यांवर तब्बल 6 हजार 432 खड्डे होते. यापैकी 6 हजार 163 म्हणजे 96 टक्के खड्डे बुजविले आहेत.(PCMC News) शहरातील रस्त्यांवर आता केवळ 269 खड्डे उरल्याचा  दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

शहर परिसरात दिवाळीपर्यंत पाऊस सुरू होता. यंदा पाऊस लांबल्याने शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. खड्यांमुळे विविध रस्त्यांवर लहान-मोठे अपघात झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. महापालिकेने आवश्‍यकतेनुसार डांबर, कोल्ड मिक्‍सने खड्डे भरले आहेत. इतर ठिकाणी मुरूम, खडी तसेच कॉंक्रिट वापरून खड्डे बुजविण्याचे काम देखील करण्यात आले आहे. त्यानुसार 28 नोव्हेंबरपर्यंत शहरातील 6 हजार 163 खड्डे बुजविण्यात आले आहेत. सध्या शहरात फक्त 269 खड्डे असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र, आजही शहरातील विविध रस्त्यांवरील खड्यांमुळे 269 च्या संख्येबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

Pune News : अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या एकाच दिवशी पुण्यात तीन शाखा कार्यान्वयीत

‘अ’ प्रभागाच्या हद्दीत 432 खड्डे होते. त्यापैकी 410 बुजविले. ‘ब’ प्रभागात 775 खड्डे होते. त्यातील 727 बुजविले. ‘क’ प्रभागातील 1 हजार 339 पैकी 1 हजार 272 खड्डे बुजविले आहेत. ‘ड’ प्रभागात 1 हजार 272 पैकी 1 हजार 240 खड्डे बुजविले आहेत. (PCMC News) तर, ‘इ’ प्रभागाच्या हद्दीतील 469 पैकी 459 खड्डे बुजविण्यात आले. ‘फ’ प्रभागाच्या हद्दीतील 940 पैकी 971 खड्डे बुजविले. ‘ग’ प्रभागातील 828 पैकी 797 खड्डे बुजविण्यात आले. तर, ‘ह’ प्रभागात 311 खड्डे होती. त्यातील 287 खड्डे बुजविले. शहरात एकूण 6 हजार 432 खड्डे होते. त्यापैकी 6 हजार 163 खड्डे बुजविल्याचा प्रशानाचा दावा आहे.

याबाबत शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ”जूनपूर्वी शहरात 2 हजार 42 खड्डे होते. 1 जून ते 28 नोव्हेंबरपर्यंत शहरात 4 हजार 390 असे 6 हजार 432 खड्डे होते. यापैकी 6 हजार 163 खड्डे बुजविले आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.