Pimpri-Chinchwad Potholes: पिंपर-चिंचवड शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज: दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील(Pimpri-Chinchwad Potholes) खड्डेमय रस्त्यांवर पाणी साचले आहे. परिणामी येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या खड्डयांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काल रात्रीपासून पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे सिटी इंटरनॅशनल स्कूल ते रिव्हर रेसिडेन्सी रस्त्यावर खड्ड्यांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे. मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून छोटी डबकी तयार झाली आहेत असं मोशी मधील नागरिक प्रकाश जुकुंतवार म्हणाले.

 

चिखली मधील जाधववाडी येथील नागरिक बाबासाहेब पाटील म्हणाले की पंतनगर,रंगनाथनगर – शुभारंभ सोसायटी रस्त्यावर पावसामुळे खूप खड्डे झाले आहेत.(Pimpri-Chinchwad Potholes) त्यामध्ये पाणी सचल्याने वाहने सावकाश चालवावी लागतात. माऊली चौक, ज्ञानोबा चौक व दत्त मंदिर जवळ मोठे खड्डे असल्याने पाण्याची डबकी झाली आहेत. ह्या खड्ड्यांमुळे वाहतूक खूप धिम्या गतीने चालू असते परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. पिंपळे सौदागर मधील रहिवासी अतुल कुमठेकर म्हणाले की, पूर्ण कुणाल आयकॉन रस्त्यावर खड्डे झाले आहेत. मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे तळ्यातून रस्ता केलेला आहे असे वाटते. बऱ्याच ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे त्यामुळे वाहतुक कोंडी होते. परिणामी अपघाताची शक्यताही वर्तवली जात आहे.

Pune Sexual exploitation: वडिलांना डबा देण्यास गेलेल्या चिमुकल्या ‘निर्भया’चे अपहरण करून लैंगिक शोषण

 

फॉर्म ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष अभय भोर म्हणाले की, भोसरी एमआयडीसी मधील टी ब्लॉक येथील कंपन्यांच्या गेट मधून रस्त्याचे पाणी शिरते.(Pimpri-Chinchwad Potholes) या खड्डयांचा त्रास सुमारे 200 ते 300 छोट्या कंपन्यांना होतो. आज त्यांना मोटर पंप लावून पाणी बाहेर काढावे लागले आहे. एमआयडीसी पोस्ट ऑफिस जवळील रस्त्या चिखलमय झालेला आहे. त्याचा त्रास येथून येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांना होतो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.