Chinchwad News : सांस्कृतिक वारसा जपणारी प्रभात कल्चरल फाऊंडेशन संस्था – संजय कुलकर्णी

एमपीसी न्यूजपिंपरी-चिंचवड क्षेत्रात गेली 19 वर्षे गायन, वादन, सामाजिक आदी क्षेत्रातील योगदान देणार्‍या संस्था व व्यक्तींचा गुणगौरव करून त्यांना प्रोत्साहन (Chinchwad News) देण्याचे काम सातत्यपूर्वक करीत आहे.  सांस्कृतिक वारसा जपणारी प्रभात कल्चरल फाऊंडेशन संस्था आहे, असे मत क्रांतीवीर चापेकर बंधू समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

यंदाच्या वर्षी गायन क्षेत्रात नाव असलेल्या शर्मिला शिंदे, धृपत गायन क्षेत्रातील शुभ्रत रॉय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे बशीर तांबोळी यांना प्रभात कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने उद्योजक व संगीत क्षेत्राची विशेष आवड असणारे प्रविण पोकरणा यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना क्रांतीवीर चापेकर बंधू समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, यावेळी प्रा. जीरापुरे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लतिफ सय्यद विलास गायकवाड, प्रसाद कोटी, सलीम सय्यद, फरजाना सय्यद आदी उपस्थित होते.

Pune News : शाश्वत विकास म्हणजे एकाही सजीवाची हानी न होता होणारा विकास – कुलगुरू डॉ काळे

मनोगत व्यक्त करताना कुलकर्णी पुढे म्हणाले, संगीत क्षेत्रातील कार्यरत संस्था जगविण्याची आवश्यक आहे. जेणेकरून शास्त्रीय संगीताची आवड युवा वर्गात निर्माण होवून भावी काळात चांगले कलाकार तयार होतील. प्रभात कल्चरल संस्था गेली अनेकवर्षे संगीत क्षेत्रात नवीन कलाकारांना व्यासपीठ (Chinchwad News) निर्माण करून देण्याचे कार्य करीत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे सदस्य चंद्रशेखर बावणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.