Pimpri news: स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवड राज्यात चौथ्या तर देशात 41 व्या स्थानी

0

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर पिंपरी – चिंचवड शहराला राज्यात चौथे तर देशात 41 वे स्थान प्राप्त झाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंतचा आढावा घेत गुणांकनाद्वारे स्थान निश्चिती करण्यात आली आहे. यापूर्वी देशात 49 वा क्रमांक होता. त्यात सुधारणा झाली असून 41 व्या क्रमांकावर शहराने झेप घेतली आहे. याबाबतची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काढण्यात आलेल्या निविदा, मार्किंग, प्रकल्पांतर्गत रस्ते आणि गृहनिर्माण आदींसाठी गुणांकन दिले जातात. याच्याच आधारावर यादी तयार केली जाते. केंद्रीय नगर विकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या यादीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा राज्यात चौथे तर देशात 41 वे स्थान प्राप्त झाले आहे. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत

याबाबत बोलताना स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, किती प्रकल्प निविदा काढल्या, कार्यारंभ आदेश किती दिले. प्रकल्प पूर्ण किती झाले. यावरून गुणांकन काढले आहे. यापूर्वी शहराचा गुणांक देशात कमी झाला होता. कारण, शहराचा तिसऱ्या टप्यात स्मार्ट सिटीत समावेश झाला होता. त्यामुळे कामे उशिरा सुरू झाली. तरी सुद्धा देशात 41 व्या क्रमांकावर आलो आहोत. ही चांगली सुधारणा आहे. जशे प्रकल्प पूर्ण होतील. तशा शहराचा क्रमांक आणखी सुधारेल. 100 टक्के निविदा प्रक्रिया केली आहे. कार्यारंभ आदेश दिले आहेत. खर्चही चांगला चालू आहे. दोन प्रकल्प राहिले आहेत. त्याचा कार्यारंभ आदेश द्यायचा राहिला आहे. उर्वरित सर्व कामे चालू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.