Chinchwad Crime News : शहरात सात चो-या; कार, दुचाकीसह पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरीच्या आणखी सात घटना उघडकीस आल्या आहेत. दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तर चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. उघडकीस आलेल्या सात घटनांमध्ये चार दुचाकी, एक कार आणि अन्य चोरीच्या घटना आहेत. यामध्ये एकूण दोन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

भानू रामदेव चव्हाण (वय 42, रा. रामनगर, बोपखेल) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चव्हाण यांनी आपली 15 हजार रुपये किमतीची दुचाकी बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास डांगे चौक, वाकड येथे उभी केली होती. दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास काम आटपून ते पुन्हा आले असता त्यांना दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.

प्रफुल्ल शांताराम वाळुंज (वय 38, रा. रास्ता पेठ, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वाळुंज यांनी आपली 25 हजार रुपये किमतीची दुचाकी बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आनंद नगर, जुनी सांगवी येथे उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.

लोकेश किशनचंद छावडा (वय 36, रा. विजय नगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी छावडा यांनी आपली 90 हजार रुपये किमतीची कार 4 डिसेंबर रोजी पिंपरीतील शास्त्री नगर येथील गुरुद्वाराच्या भिंतीलगत सार्वजनिक रस्त्यावर उभी केली होती ही मोटर 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास चोरीस गेल्याचे दिसून आले.

अब्दुलगनीभाई मुलाणी (वय 22, रा. ठाकरवस्ती, वराळे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुलाणी यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी बुधवारी रात्री अकरा वाजता आपल्या घरासमोर पार्क केली. गुरुवारी सकाळी त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

मधुकर आनंदा पवार (वय 33, रा. चिखली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पवार यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी 10 डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता मेदनकरवाडी येथील होंडा शोरूमच्या बाजूला पार्क केली. 11 डिसेंबर रोजी सकाळी त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

सुमन कैलास मोहिते (वय 33, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घराची कडी उघडून अज्ञात चोरट्याने घरातून 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी पावणे चार ते साडेचार वाजताच्या कालावधीत घडली.

संजय नारायण मोकाशी (वय 50, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या ट्रकमधून 80 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी तीन ते बुधवारी (दि. 15) सकाळी साडेनऊ वाजताच्या कालावधीत मरकळ येथील क्लोराइट मेटल्स लिमिटेड या कंपनीच्या पार्किंगमध्ये घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.