Pimpri Chinchwad RTO : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – ऑक्टोबर महिन्यात पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स ) मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा (Pimpri Chinchwad RTO) येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Alandi : एमआयटी महाविद्यालयात विज्ञान सप्ताह 2023 उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी याबाबत माहिती दिली. प्रत्येक महिन्यात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मासिक दौऱ्याचे आयोजन केले जाते. नागरिकांना परिवहन विभागाशी निगडीत सुविधा मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयात यावे लागू नये यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी खेड, 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी मंचर, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी जुन्नर, 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी वडगाव मावळ आणि 30 ऑक्टोबर रोजी लोणावळा येथे मासिक दौरा होणार आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार असल्याचेही आदे (Pimpri Chinchwad RTO) यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<