Pimpri-Chinchwad RTO : पिंपरी चिंचवड आरटीओची ‘J G’ सिरीज सुरू; पसंतीचे क्रमांक घेता येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दुचाकी वाहनांसाठी ‘जे जी’ ही नवीन सिरीज सुरू करण्यात आली आहे. नव्या सिरीजमध्ये पसंतीचे क्रमांक घेण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहेत.

पसंतीच्या क्रमांकासाठी डीडी, पत्ता, ओळखपत्र आणि पॅनकार्ड झेरॉक्ससह कारसाठी सोमवारी (दि. 2), तर दुचाकीसाठी पसंती क्रमांक हवा असल्यास मंगळवारी (दि. 3) सकाळी अकरा ते दुपारी अडीच या वेळेत नमूद कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्या नंतर 3 नोव्हेंबरला कारची आणि 4 नोव्हेंबरला दुचाकीची यादी लावण्यात येणार आहे.

राखून ठेवण्यात आलेला क्रमांक बदलून देण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या दिनाकांपासून 30 दिवसांच्या आत वाहन सादर केले नसल्यास भरलेली फी सरकार जमा होईल, याची नोंद वाहनधारकांनी घ्यावी, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.