Pimpri-Chinchwad RTO : वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज राखी पौर्णिमेलाही सुरू राहणार

Vehicle eligibility certificate renewal will continue on Rakhi Pournima : 3 ऑगस्ट 2020 रोजी योग्यताप्रमाण नूतनीकरणाचे कामकाज चालू ठेवण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 3 ऑगस्ट 2020 रोजी रक्षाबंधन निमित्त स्थानिक सुटटी जाहिर केली आहे. यामुळे नियोजित तारीख घेतलेल्या सर्व वाहनांच्या चालक/मालक यांची गैरसोय होऊ नये यासाठी रक्षाबंधनदिनी म्हणजेच राखी पौर्णिमेला  3 ऑगस्ट 2020 रोजी योग्यताप्रमाण नूतनीकरणाचे कामकाज चालू ठेवण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी ही माहिती दिली.

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाचे योग्यताप्रमाण नुतनीकरण तपासणीचे कामकाज चालू आहे.

मार्च, एप्रिल व जून या महिन्यात ऑनलाईनद्वारे नियोजित तारीख घेतलेल्या वाहनांची तपासणी लॉकडाऊनमुळे झालेली नाही.

अशा वाहनांसाठी पुढील नियोजित तारीख कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे. या नवीन तारखेला सर्व वाहन चालक/मालक यांनी वाहन तपासणीसाठी कार्यालयात आणावे, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे.

ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्यांनी पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी उपस्थित रहावे

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या 18 मार्च 2020 व 19 मार्च 2020 रोजीच्या ऑनलाईन अपॉईंटमेंट असणा-या अर्जदारांची चाचणी संपूर्ण टाळेबंदी लागू झाल्याने होऊ शकली नाही.

18 मार्च 2020 रोजी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्यांनी 1 ऑगस्ट 2020 रोजी व 19 मार्च 2020 रोजी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतलेल्यांनी 2 ऑगस्ट 2020 रोजी कार्यालयीन वेळेमध्ये अपॉईंटमेंटच्या नियोजित वेळेप्रमाणे चाचणीकरीता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.