Pimpri-chinchwad : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज : महामानव डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ‘भारतीय बौद्धजन विकास समिती’ (Pimpri-chinchwad)  तर्फे ग्रामीण भागातील गरजूवंत मुलांसाठी “एक वही,एक पेन संकलन” अभियान  ठिकठिकाणी राबविण्यात  येत आहे. या सार्वजनिक उपक्रमासाठी आपणही या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन   तमाम सावरकरप्रेमी आणि ग्रंथालय सभासदांना स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी(Pimpri-chinchwad) तर्फे करण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा !” ही त्रिसूत्री आपल्याला दिली. याच त्रिसूत्रीचे अनुकरण करत भारतीय बौद्धजन विकास समिती (Pimpri-chinchwad) असे समाजपयोगी शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत आहे व पुढेही राबवत राहील. या उपक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी व तसेच आंबेडकर अनुयायांनी वही-पेन भेट देऊन या उपक्रमात सहभाग घ्यावे असे आवाहन भारतीय बौद्धजन विकास समितीने  केले आहे.वही, पेन,पुस्तके संकलन अभियानाच्या माध्यमातून जमा झालेले शैक्षणिक साहित्य हे पिंपरी-चिंचवड शहरातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे.

Wadgaon Sheri : माजी नगरसेविका शितल शिंदे यांचे निधन

यावर्षी आपणही या अभियानात सहभागी व्हायचे असून प्रत्येकी किमान एक वही व एक पेन (अधिक कितीही चालतील) संकलित करायचे असून दि.12 एप्रिल पर्यंत हे संकलन मंडळाच्या  निगडी ग्रंथालयात जमा करायचे आहे असे आवाहन ग्रंथालयातील सर्व सभासदांना आणि सावरकरप्रेमींना स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने केले आहे. रविवार (दि.14 एप्रिल ) अभिवादनाच्या कार्यक्रमादरम्यान संकलित झालेल्या सर्व वह्या व पेन आपण एकत्रितपणे सदर संस्थेला देणार आहे  असे निगडी (Pimpri-chinchwad) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे सांगण्यात आले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम रविवार (दि. 14 एप्रिल)  सकाळी ठीक 7 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे संपन्न होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.