Pimpri Chinchwad : गुन्हे शाखेच्या तीन कारवाईमध्ये सात पिस्टल व नऊ जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने (Pimpri Chinchwad) तीन कारवाया करत सात पिस्टल आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 29) सहा जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे.

गुन्हे शाखा युनिट चारने दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली फाट्याजवळ शनिवारी (दि. 28) रात्री अकरा वाजता कारवाई केली. त्यात अक्षय रवी पाखरे (वय 22, रा. म्हाळुंगे इंगळे), प्रवीण भारत म्हस्के (वय 20, रा. पिंपळे सौदागर) यांना अटक करत त्यांच्याकडून एक लाख चार हजारांच्या दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

Alandi News : आळंदी मध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

गुन्हे शाखा युनिट चारने दुसरी कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेख वस्ती येथे रविवारी (दि. 29) पहाटे सव्वाचार वाजता केली. तुषार महिपती मगर (वय 24, रा. शेडगेवस्ती, वाकड) याला अटक केली असून त्याच्याकडून पोलिसांनी 50 हजारांचे एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे.

दरोडा विरोधी पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. 28) रात्री अकरा (Pimpri Chinchwad) वाजता कारवाई करून तिघांना अटक केली. रामदास सुरेश सुकळे (वय 39, रा. सरदार चौक, खेड), रियाज हुसेन शेख (वय 22, रा. पडाळी, ता. खेड), तुषार उर्फ डेल्या शांताराम टेके (वय 24, रा. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 77 हजार 510 रुपये किमतीच्या चार पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.