Pimpri News : पिंपरी-चिंचवड महिला उद्योजकांच्या प्रश्नासंदर्भात दुर्गा भोर यांनी दिले उद्योगमंत्र्यांना निवेदन

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महिला लघुउद्योजक (Pimpri News) संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी आज (रविवारी) उद्योगमंत्री उदय सामंत यांना पिंपरी-चिंचवड शहरातील महिला उद्योजकांच्या प्रश्नांसंदर्भात निवेदन दिले.

यावेळी महिला उद्योजकांसाठी जागा तसेच महिला उद्योगांना उद्योग व्यवसायासाठी येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे परंतु शहरांमध्ये महिलांच्या उद्योगासाठी कोणतीही पायाभूत सुविधा अद्याप उभारण्यात आलेल्या नाहीत. तसेच शहरांमध्ये महिला उद्योजक घडविण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहेत. परंतु यापुढे महिलांना शहरांमध्ये औद्योगिक परिसरामध्ये महिलांसाठी उद्योग करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Chakan News : पोदार इंटरनॅशनल स्कूल चाकण चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

महिलांना निर्यात क्षेत्रापासून आपण बनवलेल्या वस्तूंना देखील बाजारपेठ उपलब्ध होऊ शकत नाही.  त्यामुळे महिला उद्योग क्षेत्रात पुढे येण्यास माघार घेत आहेत. (Pimpri News) सरकारने शासनाने महिलांना उद्योग व्यवसायात आणण्यासाठी शासनाच्या योजना आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारल्यास निर्यात करण्यासाठी  योजना  आणि सहकार्य करावे असे सांगण्यात आले.  याप्रसंगी यावेळी उद्योग मंत्री सामंत  यांनी लवकरात लवकर यावर विचार करून पूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.