Pimpri Chinchwad : सोशल हॅंड्स फाउंडेशनकडून शहीद जवानांच्या वीरपत्नींचा सन्मान

एमपीसी न्यूज – भारतीय शहीद जवानांप्रती (Pimpri Chinchwad) व त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता म्हणून ‘भारतीय सेना दिन’ निमित्त सोशल हॅंड्स फाउंडेशन कडून 20 वीरपत्नींचा साडी भेट देऊन सन्मान करण्यात आला. सैनिक युवा फोर्स मार्फत काल (रविवारी) 22 जानेवारी रोजी थेरगाव येथे भारतीय लष्कर दिन साजरा केला गेला. यामध्ये पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. यावेळी सोशल हॅंड्स फाउंडेशन सदर उपक्रम राबविला.

याप्रसंगी निवृत्त मेजर रामदास मदणे (संस्थापक – सैनिक युवा फोर्स), सोशल हॅंड्स फाउंडेशनचे अध्यक्ष मदन दळे, निवृत्त सैनिक चांगदेव कडलग, सचिन अडागळे, नीलेश जाधव, अशोक येडगे, माधुरी मदन दळे, कडलग तसेच शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता आणि नातेवाईक उपस्थित होते.

Hinjawadi News : सोशल मिडीयावर कोयते हातात घेऊन फोटो टाकणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

देशवासी सुरक्षित राहायला हवेत यासाठी देशाच्या सीमांचे संरक्षण करताना युद्धात प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांच्या नावाने ‘अमर रहे’च्या घोषणा दिल्या जातात. पण या वीरांच्या (Pimpri Chinchwad) माघारी त्यांच्या कुटुंबापुढे कोणत्या समस्या उभ्या राहतात, त्या समजावून घेणे आवश्यक आहे, असे मत सोशल हॅंड्स फाउंडेशनचे अध्यक्ष मदन दळे यांनी व्यक्त केले.

सदर उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी निवृत्त सैनिक चांगदेव कडलग यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.