Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरातील सोहम मुळीक व पौर्णिमा दळवी यांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड 

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील सोहम मुळीक व पौर्णिमा दळवी यांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. (Pimpri-Chinchwad News) कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सोहम मुळीक व पौर्णिमा दळवी यांनी सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्यामुळे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.

5 व 6 नोव्हेंबर 2022 रोजी विभागीय क्रीडा संकुल गारखेडा, औरंगाबाद येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कराटे या प्रकारात महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, उद्योगनगर शाखेतील सोहम मुळीक व पौर्णिमा दळवी यांनी सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्यामुळे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.

शहरासाठी ही अभिमानाची बाब असून त्यांच्या या चमकदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक अभिषेक डांगे व सेको काई कराटे महाराष्ट्राचे प्रतिनिधी शिहान रवींद्र सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Shirgaon News : अन त्याने भरदिवसा दुकानातून 36 हजार रुपयांचा किराणा डोळ्यासमोरून चोरला

महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, उद्योगनगर शाखेचे संचालक प्रदीप बोरसे यांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देत राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेते खेळाडू 3 ते 4 डिसेंबर, 2022 रोजी तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणाऱ्या ‘अखिल भारतीय सब जुनिअर कराटे अजिंक्यपद 2022’ (Pimpri-Chinchwad News) स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील. ही स्पर्धा वर्ल्ड कराटे फेडरेशन, साऊथ एशियन कराटे फेडरेशन यांच्याशी संलग्न असलेल्या कराटे इंडिया ऑर्गनायजेशन यांच्या मान्यतेने संपन्न होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.