Pimpri : पिंपरी चिंचवड सुप्रियाज डान्स अकॅडमीचे  दुबईत  यश

एमपीसी न्यूज – दुबई येथील मदिनाथ थिएटर झुमिराह येथे झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघ , ऑफिशियल पार्टनर युनिस्को आयोजित ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड 2018 नृत्य नाट्य व गायन स्पर्धेत नृत्य विभागात सुवर्ण , रौप्य , कांस्य अशी एकूण 14 पदके जिंकली आहेत.

सुप्रियाज डान्स अकॅडमीच्या संस्थापिका  सुप्रिया धाइंजे-संत यांना उत्कृष्ट गुरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  प्रथम पारितोषिक विजेते सुवर्ण पदक अनुजा इनामदार,  समृद्धी यादव, खुशी हेगडे आणि स्वरा जांबवडेकर.द्वितीय पारितोषिक विजेते रौप्यपदक श्रावणी चौंडकर, अनुष्का शेडगे, निशा शेळके आणि सुप्रिया संत. तृतीय पारितोषिक विजेते कांस्य पदक श्रेया शिंदे, सई टोणगावकर. मेडीटोरियस अवॉर्ड विजेते सोहम शेटे, वेदांत वाडेकर, प्रिशा बन्सल, सृष्टी सक्सेना, अद्विता अगरवाल. या सर्वांनी मिळून पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला.
 या स्पर्धेचे परीक्षण पद्मश्री डॉ, पं. दर्शना जव्हेरी (नृत्य गुरू) ,डॉ. जी.प्रतिश बाबू , ज्ञानरथ पुरस्कार विजेत्या उज्ज्वला नगरकर आणि नेहा पाटकर यांनी केले. या स्पर्धेत भारतातील व भारताबाहेरील संस्थांचा सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.