Pimpri-Chinchwad firing : पिंपरी- चिंचवड शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी गोळीबार, हवेत झाडल्या 8 गोळ्या

एमपीसी न्यूज : पिंपरी- चिंचवड शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पिस्तूलातून सात ते आठ गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून मद्यधुंद अवस्थेत (Pimpri-Chinchwad firing) अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितल आहे. एका रिक्षातून येऊन गोळीबार करण्यात आला आहे. शाहरुख शहनवाज शेख आणि त्याच्या इतर तीन साथीदार यात सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी दिली.

पिंपरी- चिंचवड शहरातील मध्यवर्ती असलेलं ठिकाण पिंपरी भाट नगर, लिंक रोड पत्राशेड आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार अज्ञात व्यक्तींनी मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार केला आहे. अगोदर रॉबरीच्या उद्देशाने हा गोळीबार केल्याचं सांगितलं जातं होत. पण, अद्याप गोळीबाराच कारण समजू शकलेलं नाही. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. तिन्ही घटनास्थळी पिंपरी पोलीस, चिंचवड पोलिस, गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट दाखल झाले आहेत. नेमका हा गोळीबार रॉबरी च्या उद्देशाने केला आहे की आणखी काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

आज संध्याकाळी 5.45 वा ते 6 वा चे दरम्यान शहरामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हवेत गोळी बार झाला आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे म्हणाले की, भाटनगर व लिंक रोडवर हवेत गोळी बार करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार मद्यधुंद व्यक्तीने गोळी बार केला असल्याचे कळत आहे.

Kalewadi News : काळेवाडी येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई

 

या घटनेबाबत अधिक माहिती देताना, देशमुख म्हणाले की, आज संध्याकाळी 5.30 वा च्या सुमारास भाटनगर, लिंक रोड व पत्रा शेड येथे हवेत गोळी बार करण्यात आला आहे. भाटनगर व लिंक रोड हे पिंपरी पोलीस ठाण्याच्या तर पत्रा शेड हे चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला शाहरुख खान हा रिक्षा चालक असून. तो व इतर दोन जण असे तिघे जण रिक्षातून जात होते. त्यांनी थांबून थांबून प्रत्येक ठिकाणी हवेत गोळीबार केला आहे.

शाहरुख खान हा खूप दारू प्यायल्याने नशेत होता. त्याच्याकडून इतर दोन साथीदारांबाबत विचारपूस करण्यात येत आहे.खान याचा भाऊ इरफान खान भा. द. वि कलम 307 अन्वये दाखल गुन्ह्यात फरार आहे.पोलीस घटनास्थळी पोहचून तपास करत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.