Pimpri : चिंचवडला 3 सप्टेंबरपासून गणरायाची विविध रूपे रांगोळीतून साकारणारे भव्य प्रदर्शन

एमपीसी न्यूज – रांगोळीने काढलेली गणरायाची विविध रूपे पाहण्याची अनोखी संधी पिंपरी चिंचवडकरांना येत्या 3 सप्टेंबरपासून चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाटयगृहातील कलादालनात मिळणार आहे.

येथील अंशुल क्रिएशन्स या संस्थेच्या वतीने आयोजित मुंबईतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार नंदू शिंदे यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरविण्यात आले असून येत्या 3 ते 8 सप्टेंबरपर्यंत विनामूल्य सर्वांना हे पाहता येणार आहे.

अष्टविनायकाची आठ रूपे, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ, अखिल मंडई गणपती, मुंबईतील लालबागचा राजा, सिद्धिविनायक, कोकणातील गणपतीपुळेचा गणपती, चिंचवड येथील मोरया गोसावी आदी गणपती रूपांच्या 20 भव्य रांगोळ्या या प्रदर्शनात आहे.

प्रत्येक रांगोळी आठ फूटाची असून 26 किलो रांगोळी यासाठी वापरण्यात आली असल्याची माहिती अंशुल क्रिएशनसचे विजय जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.