Pimpri Chinchwad : तरुणाकडून दोन पिस्तुल जप्त,गुंडा विरोधी पथकाची कामगिरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका (Pimpri Chinchwad)तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. 20) सायंकाळी जुना पुणे मुंबई महामार्गावर भक्ती शक्ती चौकाजवळ करण्यात आली.

निखील दिलीप भागवत (वय 30, रा. आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शुभम कदम यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना (Pimpri Chinchwad)पुणे-मुंबई महामार्गावर भक्ती शक्ती चौकाच्या पुढे एका हॉटेल जवळ एकजण संशयितरीत्या आला असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन निखील भागवत याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन हजार रुपयांची चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त करत निखील याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.