Pimpri: रद्द परीक्षांचे शुल्क विद्यापीठाने परत करावे; छात्र युवा संघर्ष समिती, ‘आप’ युवा आघाडीची मागणी

Pimpri-chinchwad University to reimburse canceled examination fees demand by chatra yuva sangharsh samiti and aap yuva aghadhi आप तर्फ 'परीक्षा फी परत करा' हे हॅशटॅग वापरून ट्विटर कॅम्पेन चालवण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज- कोविड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या परीक्षांसाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून 200 ते 2000 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले आहे. मात्र, परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे हे आकारण्यात आलेले शुल्क विद्यापीठाने परत करावे अशी मागणी छात्र युवा संघर्ष समिती व ‘आप’ युवा आघाडीने केली आहे.

कोविड-19 महामारीमुळे पालक वर्ग देखील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने आकारलेली परीक्षा शुल्क परत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी ‘छात्र युवा संघर्ष समिती’ व ‘आप’ युवा आघाडीच्या वतीने केली आहे.

या मागणीसाठी ‘आप’ च्या वतीने पुणे व मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र देण्यात आले आहे. तसेच आप तर्फ ‘परीक्षा फी परत करा’ हे हॅशटॅग वापरून ट्विटर कॅम्पेन चालवण्यात येत आहे.

याबाबत बोलताना छात्र युवा संघर्ष समितीचे महासचिव महेश सामंत म्हणाले की, लॉकडाऊनमुळे नागरिकांवर आर्थिक ताण आला आहे. महाराष्ट्रात बरेच विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील, कामगारवर्गातील व काही स्वतः कमवून शिकणारे आहेत.

परीक्षा फी परत मिळाल्यास या विद्यार्थ्यांच्या परिवाराला बरीच मदत मिळू शकेल. जोपर्यंत परीक्षा फी परत मिळत नाही, तोपर्यंत समिती प्रयत्न करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आप युवा आघाडीनेचे उपाध्यक्ष संदीप सोनावणे म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अंतिम वर्ष सोडून इतर सर्व परीक्षा रद्द झालेल्या असताना अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी वसूल करणे म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्यासारखा प्रकार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.