Corona Vaccination Updates : शहरातील 19 केंद्रांवर शनिवारी होणार लसीकरण

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू असून तीन लसींद्वारे ही मोहीम राबवली जात आहे तसेच 12 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करणे सध्या सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (दि. 21) लसीकरण सुरु असून शहरातील 19 केंद्रांवर हे लसीकरण केले जाणार आहे.

उपलब्ध लसीच्या साठ्यानुसार 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना कॉर्बेवॅक्स (Corbevax) लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाईल. 14 वर्ष आणि त्यापुढील सर्वांना कोवॅक्सीन तसेच 18 वर्ष आणि त्यापुढील सर्वांना कोविशिल्ड लसीचा पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षांपुढील लाभार्थी यांचेही लसीकरण सुरु आहे.

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल आकुर्डी, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, किवळे दवाखाना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, सेक्टर नंबर 29 आठवडी बाजरी शेजारी रावेत, पिंपरी चिंचवड महापालिका शाळा जाधववाडी, नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, मोशी दवाखाना, नवीन भोसरी रुग्णालय, स्व. अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, तळवडे समाजमंदिर शाळा, यमुनानगर रुग्णालय, म्हेत्रेवस्ती दवाखाना, नवीन जिजामाता रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा, निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी, नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, यमुनानगर दवाखाना, नवीन जिजामाता रुग्णालय, अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.