Pimpri Corona Update : लसीकरणाचा 26 लाखाचा टप्पा पूर्ण! शहरात 40 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 40 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 26 लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

आजपर्यंत शहरातील 4 हजार 510 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 77 हजार 544 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 337 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 123 रुग्ण गृहविलगीकरणात असून 214 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 23 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 255 आहेत. आज दिवसभरात 21 हजार 222 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजपर्यंत 26 लाख 3 हजार 561 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.