मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Waste collection center : कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करा; माजी नगरसेवक अमित गावडे यांची काम बंद करण्याची सूचना  

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचऱ्याचे योग्य रितीने व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निगडी प्राधिकरणात दाट लोकवस्तीत कचरा संकलन केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांचा विरोध असूनही पुन्हा काम सुरु करण्याचा (Waste collection center) आज (गुरुवारी) प्रयत्न केला असता माजी नगरसेवक अमित गावडे यांच्यासह नागरिकांनी तिथे धाव घेतली. तत्काळ काम बंद करण्याची सूचना गावडे यांनी महापालिका अधिका-यांना दिल्या.

उद्योगनगरीत दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे 81 एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे एक हजार मेट्रीक टन कच-याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. शहरातील घनकचऱ्याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी इंदूर शहराच्या धर्तीवर चार ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत.

Wakad crime : मेहूण्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने एकास अटक

प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 26 येथे कचरा संकलन केंद्र उभारण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले. परंतु, हे केंद्र दाट लोकवस्तीत उभारले जात असल्याने माजी नगरसेवक अमित गावडे यांनी त्याला विरोध केला. हे कचरा संकलन केंद्र दुसरीकडे स्थलांतरित करण्याची त्या भागातील नागरिकांची पूर्वीपासूनची मागणी आहे.(Waste collection center) याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला. महापालिका आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. त्यानंतरही प्रशासनाने आज पुन्हा काम सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नागरिकांसह तिथे जाऊन पुन्हा एकदा काम तातडीने थांबविण्याच्या सूचना माजी नगरसेवक गावडे यांनी दिल्या.

”कचरा संकलन केंद्राची जागा रिंगरोडची आहे. त्या जागेत महापालिका केंद्र कसे उभारु शकते.(Waste collection center)  आजूबाजूला लोकांची घरे आहेत. लोकांना कच-यांचा वास येईल. रहिवाशी भागात  दुर्गंधी पसरेल. त्यामुळे कचरा संकलन केंद्र लोकवस्तीपासून दूर करण्याची आमची आग्रही मागणी असल्याचे” गावडे यांनी सांगितले.

Latest news
Related news