BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

PST-BNR-FTR-ALL
एमपीसी न्यूज – पवना  धरणाच्या  विद्युत  निर्मिती  संचामद्धे  बिघाड  झाल्यामुळे  बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे पाण्याचा नागरिकांनी जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. 
पवना  धरणाच्या  विद्युत  निर्मिती  संचामद्धे  बिघाड  झाला आहे. त्यामुळे धरणातून  नदीमधे  पाणी  सोडण्याच्या  दैनंदिन  प्रक्रियेत  व्यत्यय  आला असून  रावेत  बंधाऱ्यातील  पाण्याची पातळी खालावली आहे.
तसेच  धरणातून  बंधाऱ्यात  येणारे पाणी   कमी  झाल्याने  अशुद्ध जल उपसा केंद्रातील  काही  पंप्स  बंद  करावे आहेत.  त्यामुळे  शहरातील  पाणी पुरवठा मंगळवारी विस्कळीत झाला होता.
बुधवारी देखील शहरातील पाणी पुरवठा  विस्कळीत  राहणार आहे. पाणी पुरवठा  पूर्ववत  करण्यासाठी  विभाग  प्रयत्न  करीत  आहे.  नागरिकांनी  उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
.

HB_POST_END_FTR-A1
.