_MPC_DIR_MPU_III

Pimpri: पवार घराण्याला घरी बसविण्याचा इतिहास पिंपरी-चिंचवडकरांनी केला – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत भाजपची सत्ता येईल. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेत येणार नाही, असे सर्वांना वाटत होते. पिंपरी महापालिका भाजपने जिंकल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मी-मी म्हणनारे तोंडात बोट घालून घरी बसले. लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून जो दणका दिला तो सर्वांत महत्वाचा होता. पवार घराण्याला घरी बसविण्याचा इतिहास पिंपरी-चिंचवडकारांनी केला. ही काळाची गरज होती, असे भाष्य पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, पुणे शहराचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी केले.

_MPC_DIR_MPU_IV

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. माजी पालकमंत्री गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येत संसदेत गेले आहेत. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे आज (सोमवारी) दोघांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शहर भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचे त्यांचे हस्ते ई-उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी बापट बोलत होते.

  • मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव झाला. त्यावर बापट यांनी भाष्य केले. मावळ मतदारसंघातून आम्हाला माहीत होते. युतीचाच खासदार होणार आहे. आम्ही ते सांगत होतो. पण, लोक विश्वास ठेवत नव्हते, असेही बापट म्हणाले.
_MPC_DIR_MPU_II

बापट म्हणाले, पालकमंत्री म्हणून काम करत असताना सर्वांना सोबत घेतले. सर्वांना सोबत घेऊन, मिळून मिसळून काम केले. सर्वांनी चांगली साथ दिली. त्यामुळे लोकांना वाटायचे असे पालकमंत्री कसे, एवढे साधे राहतात. आधीच्या काळात पालकमंत्री म्हटले की लोकांच्या अंगावर काटा यायचा. कारण, ते पालकमंत्रीच तसे होते, असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीका केली. आम्ही निवडून येतो. त्यामुळे मालकमंत्री म्हणून नव्हे तर, लोकप्रतिनीधी म्हणून सर्वसामान्यांसोबत घेऊन काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

  • पिंपरी-चिंचवडमध्ये मान्यवर खूप आहेत. कारण, त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. एवढे मान्यवर महाराष्ट्रात कुठेच नाहीत. पिंपरीत चांगले वातावरण आहे. पण ते समजायला मला साडे चार वर्ष लागली, असेही ते म्हणाले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.