67 National Filmfare Awards: पिंपरी चिंचवडकर सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका राष्ट्रीय पुरस्कार, आज होणार वितरण 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडकर सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. सावनी आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारेल. 

2019 च्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे आज (सोमवारी, दि.25) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वितरण केले जाणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत विज्ञान भवन, दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. कोरोनामुळे हा पुरस्कार सोहळा लांबणीवर पडला होता.

स्वप्नांवर आधारित असलेल्या ‘बार्डो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केले आहे. या चित्रपटातील ‘रान पेटलं’ हे गाणं प्रचंड वेगळं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं रेकॉर्ड करताना संगीतकार रोहन-रोहन यांनी सावनी कडून टोन चेंज करून ग्रामीण पद्धतीच्या आवाजात गाऊन घेतले होते. सावनीने याआधी मराठी, हिंदी, तमिळ, पंजाबी अशी विविध भाषेतील गाणी गायली आहेत.

सावनी रविंद्रला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच, सावनीला हा पुरस्कार मिळाल्याने मराठी सिनेसृष्टीत तसेच सर्व गायन क्षेत्रातील कलाकारांकडून प्रचंड कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.