Chinchwad: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे स्वागत करणारा ‘तो’ पोलीस कर्मचारी निलंबित

pimpri chinchwad's police employee suspended who welcoming accused in murder case

एमपीसी न्यूज- खुनाच्या गुन्ह्यातील एका आरोपीची येरवडा कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. त्यावेळी दुचाकी व चारचाकी वाहनातून आरोपीच्या नातेवाईकांनी रॅली काढली. या रॅलीत पिंपरी चिंचवड आयुक्तालयात कार्यरत असलेला एक पोलीस कर्मचारी देखील सहभागी झाला होता. मिरवणूक काढणाऱ्यांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली.

विश्रांतवाडी पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याकडून बेकायदेशीर शस्त्रेही जप्त केली आहेत. त्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मालिन केल्याचा ठपका ठेवत त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

शरीफ बबन मुलाणी (वय 36, रा. भोसरी) असे निलंबित करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शुक्रवारी त्याची ड्युटी भोसरीमध्ये लावण्यात आली होती. मात्र कामाच्या ठिकाणी हजर न राहता तो खूनाच्या गुन्ह्यातील पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचे स्वागत करण्यासाठी येरवडा कारागृह येथे गेला.

आरोपीची सुटका झाल्यावर त्याची दुचाकी आणि चारचाकी वाहनातून रॅली काढण्यात आली. त्या रॅलीत हा पोलीस कर्मचारीही सहभागी झाला.

विश्रांतवाडी पोलिसांनी ही रॅली अडवून सर्व वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये मुलाणी बसलेल्या कारमध्ये एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलीस कर्मचारी सोमनाथ खळसोडे यांच्या फिर्यादीवरून आझाद शेखलाल मुलाणी (वय 30, रा. चिखली), आदेश दिलीप ओकांडे (वय 21, रा. निगडी), मुबारक बबन मुलाणी (वय 38 रा चिखली) संदीप किसन गरुड (वय 40 रा. तळेगाव दाभाडे) हुसेन जाफर मुलाणी (वय 43) सिराज राजू मुलाणी (वय 22), विनोद नारायण माने (वय 26, तिघेही रा. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी आरोपीला अटकही केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like