Raaga Palace: पिंपरी-चिंचवडकरांच्या उदंड प्रतिसादानंतर रागा पॅलेसचा आणखी एक बैंक्वेट हॉल शहरवासियांच्या दिमतीला

एमपीसी न्यूज: लग्न असो की कंपनीची मिटींग, साखरपुडा ते वाढदिवस अगदी काहीही थाटात साजरे करायचे असेल तर रागा पॅलेस आहे ना…पिंपरी-चिंचवडकरांच्या उदंड प्रतिसादानंतर रागा पॅलेस (Raaga Palace) यांनी आणखी एक प्रशस्त व सुसज्ज बँक्वेट हॉल शहरवासीयांसाठी उपलब्ध केला आहे.

हा हॉल 3 जुलैपासून खुला करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथील रागा रेस्टॉरंट, चिंचवड स्टेशन येथील रागा व्हेज थाळी, ताथवडे येथील रागा एम्पेरीओ या तीन बँक्वेट हॉल या सर्वांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर रागा पॅलेसचा आणखीन एक नवीन बँक्वेट हॉल नागरिकांच्या सेवेत रुजू होत आहे.

रागा पॅलेसचे ठिकाणही अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे काळेवाडीतील बीआरटीएस रोडवर एम्पाय़र इस्टेट उड्डाणपुलाच्या जवळ असल्याने तेथे शहराच्या कोणत्याही भागातून पोहचणे सहज सोपे जाते. त्यामुळे रागा पॅलेसला कार्यक्रम करणे सर्वांनाच सोयीचे ठरते. रागा पॅलेस येथे आता दोन हॉल झाले आहेत. येथील जुना हॉल हा 10 हजार स्क्वेअर फीटचा असून त्यात 500 ते 600 लोकांची सर्व सुविधा करण्यात येत होती.(Raaga Palace) नागरिकांचा त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याला लागूनच रागा पॅलेसचा नवीन हॉल तयार करण्यात आला आहे. जो 7 हजार स्क्वेअर फीट असून तेथे 400 ते 500 नागरिकांची सुविधा उपलब्ध होऊ शकते. दोन्ही हॉल हे एसी व संपूर्ण सोयी सुविधांनी सुसज्ज आहेत. नावाला शोभेल असे दोन्ही हॉलचे इंटेरीअर हे महालाप्रमाणे आहे. त्यामुळे शाही लग्नसोहळ्याचा फील तुम्हाला रागा पॅलेस देईल यात शंकाच नाही. केवळ हॉल नाही तर पाहुण्यांना राहण्यासाठी तीन प्रशस्त व सुसज्ज खोल्याही तुम्हाला गरजेनुसार उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

raaga hotel

जागेप्रमाणेच येथील जेवणही अगदी शाही आहे बरं का मंडळी! जेवणाची चव, थाट व पद्धतही एकदम शाही. यात सर्व शुद्ध शाकाहारी असून सूप, सलाद, स्टार्टर,डेजर्ट,रायता,राईसचे व नूडल्सचे विविध प्रकार, वेलकम ड्रिंक्स,मेन कोर्स अशा  अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल असून लाईव्ह काऊंटर सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.(Raaga Palace) तसेच मेन्यूमध्ये व्हेज बफेटचीही सुविधा असून त्याचे विविध पॅकेजस उपलब्ध आहेत. यामध्ये वेलकम ड्रिंक्स ते डेजर्टपर्यंत सर्वकाही माफक दरात मिळणार आहे.

केवळ वरवरचा दिखाऊपणा नाही, तर हे सर्व करत असताना स्वच्छता व निटनिटकेपणा ठेवणारा स्टाफ, कार्यक्रमासाठी आलेल्यांना नम्र वागणूक, कार्यक्रमासाठी आलेल्या पै-पाहुणे असो की मिटींगसाठी आलेले कंपनीचे अधिकारी यांच्या वाहनतळासाठी तब्बल शंभर ते दिडशे गाड्या मावतील एवढे मोठे व स्वच्छ पार्कींग येथे उपल्बध करून देण्यात आलेले आहे.(Ragga Palace) हे पॅलेस सकाळी नऊ ते दुपारी साडे तीन तर सायंकाळी सहा ते रात्री 11 या कालावधीत ग्राहकांसाठी खुले असणार आहे. त्यामुळे रागा येथे कार्यक्रम म्हणजे खात्रीशीर सोय असेच म्हणावे लागेल. तर विचार कसला करताय, तुमच्या आनंदाच्या क्षणांना रागा पॅलेससह साजरे करा आणि अविस्मरणीय आठवणी सोबत घेऊन जा.

पत्ता- रागा पॅलेस,काळेवाडी,एम्पायर इस्टेट उड्डाणुलाजवळ, काळेवाडी बीआरटीएस रोड

संपर्क –  8888477799 व 9881907127

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.