Pimpri : शहरवासीयांनो शास्तीकर माफ होतोय …. दिवस राहिले 12 !

विरोधकांकडून 'काउंट डाऊन' सुरु ; महापालिका भवनासमोर लावला 'काउंट डाऊन'चा फलक 

0 771

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू या..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वसानाचे विरोधकांनी आज (शनिवार)पासून ‘काऊंट डाऊन’ सुरु केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनो शास्तीकर माफ होतोय …. दिवस राहिले 12! असा ‘काऊंट डाऊन’चा फलक  महापालिका भवनासमोर लावला आहे. उद्या महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयासमोर ‘काउंट डाऊन’चा फलक लावला जाणार आहे.

HB_POST_INPOST_R_A

महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ‘काउंट डाऊन’चा फलक लावताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे, नगरसेवक नाना काटे, नवनाथ जगताप, मयूर कलाटे, नगरसेविका वैशाली काळभोर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, कविता खराडे, गंगा धेंडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 9 जानेवारी) शहरातील अनधिकृत बांधकामांची शास्ती येत्या पंधरा दिवसात माफ करु असे आश्नासन दिले होते. त्याचे विरोधकांनी ‘काउंट डाऊन’ सुरु केले आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेला दिवस सोडून देण्यात आला आहे. त्यानुसार शास्तीकर माफीचा निर्णय घेण्यासाठी आजपासून केवळ 12 दिवस राहिले शिल्लक आहेत.

आज विरोधकांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनो शास्तीकर माफ होतोय….दिवस राहिले 12! असा ‘काऊंट डाऊन’चा फलक  लावला आहे. या फलकावर विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे यांची नावे आहेत. उद्या

”शास्तीकर माफ झालाच पाहिजे”, ”मुख्यमंत्र्यांनी आश्नासन पाळावे”, ”खोटे आश्वासन देणा-या भाजप सरकारचा धिक्कार असो”, ”भाजप सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय” अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: