Pimpri: गांधीनगर झोपडपट्टीचे फेरसर्वेक्षण करण्यासाठी नागरिकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचे फेरसर्वेक्षण करावे, या मागणीसाठी नागरिकांनी आज (मंगळवारी) महापालिकेवर मोर्चा काढला.

पिंपरी, गांधीनगर येथील भुखंडावर वसलेल्या वसाहतीमधील नागरिकांचे 40 वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे. मात्र, अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे पूर्वीचे सर्वेक्षण रद्द करून नव्याने सर्वेक्षण करावे. त्याचठिकाणी पुनर्वसन करावे या मागण्या आंदोलकांनी केल्या. माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.

फेरसर्वेक्षणासाठी वसाहतीतील दोन कार्यकर्ते व महापालिकेचे अधिकारी यांची समिती नियुक्त केले जातील, असे आयुक्तांनी आश्वासन दिल्याचे कदम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.