Pimpri: नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना ,इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रात सतत पडणा-या पावसामुळे वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठी असणा-या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महापौर राहूल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येत्या काळात आणखी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नदीकाठी असणा-या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

  • महापालिकेच्या मुख्य कार्यालयाबरोबरच आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. संभाव्य पूराचा धोका लक्षात घेता नदीकाठी राहणा-या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.