pimpri: ‘तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांनो, स्वत:हून तपासणी करा’

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आवाहन ; कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास हातभार लावा

एमपीसी न्यूज – दिल्लीतील निजामुद्दीन, मरकज येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता शहरातील कोणीही उपस्थित राहिला असाल तर आपण स्वत: पुढाकार घेवून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्याबाबतची माहिती द्यावी.  तसेच स्वतःची वैद्यकीय  तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास हातभार  लागावा , यासाठी महापालिकेचा हेल्पलाईन  ८८८८००६६६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि,  निजामुद्दीन, मरकज येथे आयोजित  धार्मिक परिषदेकरिता  उपस्थित राहिलेल्या शहरातील नागरिकांपैकी काही व्यक्तींना व त्यांचे संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.

परंतु, अद्यापही या धार्मिक परिषदेकरिता उपस्थित राहिलेले अनेक नागरिक त्यांची ओळख उघड करित नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच त्यांचे कुटुंबाला देखील त्याचा धोका संभावतो. आजमितीपर्यंत शहरातील सर्व नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे व यापुढेही अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.