Pimpri : शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विविध उपक्रमाने नागपंचमी साजरी

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडीच्या वतीने सोमवार (दि. ५) रोजी नागपंचमीच्या निमित्ताने महिलांसाठी पारंपारिक खेळ तसेच मंगळागौरीची गाणी आणि महिलांसाठी विविध स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला संस्कृती ग्रुप प्राधिकरणाच्या प्रमुख ज्योती कानेटकर यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी आपली संस्कृती व परंपरा तसेच विविध सण आणि त्याचे महत्व सांगितले.

  • या कार्यक्रमाचे आयोजन शहर संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, नगरमेविका अश्विनी चिंचवडे, सरिता साने (पिंपरी विधानसभा), अनिता तुतारे (चिंचवड), कोमल काळभोर, शैला पाचपुते, शैला निकम तसेच स्वरूप खापेकर, उषा आल्हाट, शर्वरी जळमकर, शिल्पा अनपण, वर्षा देशमुख, अनुराधा आहेर, वंदना खंडागळे, मंदा फड, कमल गोडाचे, श्वेता कापणे, मनीषा काळे, पल्लवी करे, प्रिया लोंढ, दिपाली थोरात व आदी महिला पदाधिकारी यांनी केले.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती, अशी माहिती शिवसेना शहर संघटिका अॅड. उर्मिला काळभोर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.