Pimpri: शहराचा गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज – रावेत पंपींग स्टेशनमधील तातडीची कामे, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभागाची, विद्युत विभागातील नियमित कामे करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.20) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद  राहणार असून शुक्रवारी (दि.21) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत पंपींग स्टेशनमधील काही तातडीची आवश्यक कामे, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभागाची आणि विद्युत विभागातील नियमित देखभाल दुरुस्तीची कामे 13 डिसेंबर रोजी करण्यात येणार होती. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा बंद रद्द करण्यात आला होता.

आता पाणी वितरण व्यवस्थेतील ही दुरुस्ताची कामे येत्या गुरुवारी (दि.20)करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाणार असून सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शुक्रवारी (दि.21) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.