Pimpri: स्वच्छ सर्वेक्षण, नागरिकांच्या प्रतिक्रियांना 1100 गुणांक

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरु आहे. सर्वेक्षणादरम्यान नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. नागरिकांना सात प्रश्न विचारले जाणार आहेत. नागरिकांनी योग्य व अपेक्षित उत्तरे दिल्यास स्वच्छ सर्वेक्षणातील नागरिकांचा प्रतिसाद अंतर्गत माहिती शिक्षण व संवाद (IEC) करताचे 1100 गुणांक महापालिकेला मिळणार आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरु आहे. स्वच्छ महाराष्ट्र/भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सहभागी झाले आहे. शहरातील परिसर स्वच्छ, सुंदर, हरित असून शहरातील स्वच्छतागृह स्वच्छ आहेत. महापालिकेचे कर्मचारी ओला व सुका कचरा वेगळा देण्यास सांगतात. शहरास हागणदारीमुक्त(ओडीएफ ++) दर्जा व स्टार मानांकन मिळाले आहे, असे उत्तरे नागरिकांनी देण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

नागरिकांना सर्वेक्षणाची माहिती मिळावी. यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत डिझाईन तयार करण्यात आले आहे. महापालिकेमार्फत वेबसाईट, व्हाटसऍप ग्रुप, फेसबुक, ई-मेल, बल्क एसएमएस याद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.