Pimpri : पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी महास्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, मु.पो.रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड यांच्या वतीने उद्या (रविवारी) शहरात महास्वच्छता अभियान व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात श्री सदस्यांमार्फत रविवारी सकाळी सात ते दहा या वेळेत महास्वच्छता अभियान व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील आकुर्डी रेल्वे स्टेशन ते बॉम्बे सिलेक्शन, चिंचवड स्टेशन, वाहतुकनगरी परिसर, खंडोबा माळ ते थरमँक्स चौक, संघवी केसरी कॉलेज ते परशुराम चौक, पिंपरीनगर बी ब्लॉक 1 ते 32 लेन या ठिकाणी स्वच्छता मोहीम होणार आहे. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामधील चिंचवडेनगर कॉर्नर ते गुरुमैय्या शाळा मार्गे पॉवर हाऊस वॉल कंपाऊड पर्यंत, बिर्ला घाट ते मोरया गोसावी मंदिर, बिजलीनगर पाण्याची टाकी ते इस्कॉन मंदिर, विकासनगर शिंदे पेट्रोल पंप ते मुकाई चौक ते पुनावळे पर्यंत या ठिकाणी स्वच्छता मोहीम होणार आहे.

‘क’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एच.ए. मैदान (दोन्ही बाजू), से.नं.16 सीएनजी पेट्रोल पंपामागील मैदान, जाधववाडी, अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील पटांगण, मातेरे कंन्स्ट्रक्शन ते कृषी उत्पन्न बाजार समिती, बो-हाडेवाडी या ठिकाणी स्वच्छता मोहीम होणार आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये पिंपळेगुरव सुदर्शन चौक ते भगत सिंग चौक, वाघजाई हॉटेल ते छत्रपती बँक रोड, इंदिरा कॉलेज ते पुनावळे सर्व्हिस रस्ता या ठिकाणी स्वच्छता मोहीम होणार आहे. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये माई वडेवाला ते बनाच्या ओढ्यापर्यंत आळंदी रोड, लांडेवाडी चौक ते आशिर्वाद मोरी गॅस एजन्सी ते गव्हाणे वस्ती ते सुविधा अपार्टमेंट शीतलबाग या ठिकाणी स्वच्छता मोहीम होणार आहे.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर चौक, त्रिवेणीनगर चौक ते कुदळवाडी ब्रिज, आर.टी.ओ. कार्यालय परिसर पूर्णानगर, अंकुश चौक ते रुपीनगर कमान या ठिकाणी स्वच्छता मोहीम होणार आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील नव महाराष्ट्र शाळा ते रेल्वे गेट डेअरी फार्म, साई चौक, पिंपरी ते पुणे- मुंबई रस्ता, डाल्को कंपनी रोड, काळेवाडी फाटा ते डांगे चौक, डांगे चौक ते काळाखडक, काळेवाडी फाटा ते पिंपरी चौक या ठिकाणी स्वच्छता मोहीम होणार आहे.

‘ह’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सांगवी फाटा ते पी.डब्ल्यू.डी मैदान, नाशिक फाटा ते शीतलबाग सोसायटी (दुतर्फा रस्ता) या ठिकाणी स्वच्छता मोहीम होणार आहे. महापालिकेच्या वाहनांमार्फत कचरा गोळा करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी व प्रतिष्ठानचे श्री सदस्य बहुसंख्येने सहभागी होणार आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.