Pimpri : कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अत्यावश्यक सुविधा सोडून सर्व दुकाने बंद करा – राजेंद्र चिंचवडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणू संसर्ग जलद गतीने पसरत आहे. त्यामुळे शहरातील किराणा दुकान, मेडिकल व दवाखाने व अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने, कारखाने जिल्हा व पालिका प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवावेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे यांनी केले आहे.

व्यापारी व नागरिकांनी जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे व कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जनजागृती करावी. तसेच रविवारी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत घरातून बाहेर पडू नये. या दिवशी ‘जनता कर्फ्यु’चे पालन करावे, असे आवाहन चिंचवडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.