BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : सीएनएस शाळेतर्फे मधुरभाव वृध्दाश्रमामध्ये आजी-आजोबा दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख येथील मधुरभाव वृध्दाश्रमातील आजी-आजोबांसाठी सीएनएस शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ पालक दिन आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.

या कार्यक्रमाला सीएनएस शाळेच्या संस्थापिका अपर्णा गडकरी, मधुरभाव वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक विठ्ठल करंजाळे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात संस्थापिका अपर्णा गडकरी म्हणाल्या, “आजी-आजोबांचे नातवंडाबद्दलचे प्रेम हे निरपेक्ष असते. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आजी-आजोबांचा सहवास नातवंडासाठी मोलाची भूमिका बजावतो. या उद्देशाने आजी-आजोबा आणि नातवंडे यांचे नाते दृढ करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते”

हा कार्यक्रम पाहून मधुरभावमधील ज्येष्ठ पालकांचा उत्साह द्विगुणित झाला.

HB_POST_END_FTR-A2

.